विधान परिषदेतील रिक्त जागांवर निवडणूक जाहीर , वाचा सविस्तर
विधान परिषदेतील रिक्त जागांवर निवडणूक जाहीर , वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
 राज्यात विधान सभा निवडणुकीत महायुतिने घवघवीत यश मिळविले असून आता विधानसभा निवडणूक निकालानंतरच्या तीन महिन्यांनी रिक्त पाच विधान परिषदेतील रिक्त जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गट एक, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर भाजपच्या तीन रिक्त जागांवर निवडणूक होईल. १० मार्च ते १७ मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल.


विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड विजय मिळविला असल्याने विधान परिषद निवडणुकीत अजिबातच स्पर्धा पाहायला मिळणार नाही. महायुतीच्याच पाच आमदारांच्या जागा रिक्त झाल्या असल्याने संबंधित जागांवर महायुतीच्याच उमेदवारांची निवड होईल.

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानुसार १० मार्च ते १७ मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल. तसेच अर्जाची छाननी १८ मार्च रोजी होणार आहे. २० मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल तर २७ तारखेला विधान परिषद जागांसाठी मतदान पार पडेल.

दरम्यान, शिवसेना आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर, भाजप आमदार प्रवीण दटके, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप आमदार रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. या सगळ्या आमदारांची निवड विधानसभेवर झाली आहे. त्यामुळे रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group