मराठी भाषेतून एमएचे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला यासंदर्भातील ठाणे महानगर पालिकेने परिपत्रक काढले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याविषयी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मराठी भाषेतून एमएचे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. मात्र मनसेचे आंदोलन आणि समाज माध्यमांवरील वाढत्या दवाबाने पालिका प्रशासन झुकले असून उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्तांना निर्णय रद्द करण्यास सांगून एमए केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय लागू करण्याचे निर्देश दिले.
मराठी भाषेतून एमएचे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. ठाणे पालिकेने काढलेल्या या परिपत्रकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. राज्यात अतिशय उत्साहाने मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना असे परिपत्रक काढून ठाणे पालिकेने मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केली असल्याचा आरोप मनसेने केला. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे पालिका आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतरच्या काही तासांतच महापालिकेला आपला निर्णय बदलावा लागला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे महापालिकेने एम ए मराठी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन वाढ रोखण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मला ही गोष्ट समजताच मी लगोलग ठाणे आयुक्तांना संबंधित परिपत्रक मागे घेण्याचे निर्देश देऊन मराठी एमए केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय लागू करण्यास सांगितले आहे.त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांची वेतवाढ रोखली गेली होती, ती आता पूर्ववत होईल. संबंधित परिपत्रक मागे घेण्याचे निर्देशही ठाणे महापालिका आयुक्तांना दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी सांगितले.