रेल्वेतून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने त्याच्या रेल्वे प्रवासादरम्यानचा संतापजनक प्रकार शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह प्रवास करत होती. त्याची बायको शेजारच्या सीटवर झोपली होती. मात्र ही व्यक्ती बायकोऐवजी शेजारी झोपलेल्या मुलाला पाहून आकर्षित झाली. या व्यक्तीने शेजारी झोपलेल्या मुलाला स्पर्श केला आणि त्याचं चुंबन घेतलं. या प्रकारानंतर मुलाने संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर मुलाने त्या व्यक्तीचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे.

या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलाचं नाव निर्मल मिश्रा आहे. त्याच्यासोबत झालेल्या कृत्यानंतर त्याने आरोपीचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्याने लिहिलंय की, पुणे-हटिया एक्स्प्रेसमध्ये माझ्यासोबत छेडछाड झाली. बिहारमधील एका 33 वर्षी व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि मी झोपेत असताना माझं चुंबन घेतलं. जेव्हा त्याला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, मला आवडलं म्हणून किस केलं. याबाबत त्याने आरपीएफकडे तक्रार केली, मात्र त्यांनी यावर काही कारवाई केली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे त्या व्यक्तीच्या पत्नीनेही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. जाऊद्या, सोडून द्या असं आरोपी महिलेची पत्नी पीडित तरुणाला सांगताना व्हिडिओत दिसत आहे. तर ती व्यक्ती माझी चूक झाली असं निर्लज्जपणे सांगताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान या घटनेचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांकडून यावर संताप व्यक्त केला जात आहे.