मंत्री जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ ! महिला राजभवनासमोर उपोषणाला बसणार
मंत्री जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ ! महिला राजभवनासमोर उपोषणाला बसणार
img
दैनिक भ्रमर
राज्यातील राजकारणातील घडामोडींना वेग आला असून  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला. या आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून  आता जयकुमार गोरेंविरोधात तक्रार करणारी महिला समोर आली आहे. 


जयकुमार गोरेंसोबत 2015-2016 मध्ये एका कार्यक्रमात ओळख झाली होती. अमुक योजना त्यांच्या तालुक्यात राबवावी यासाठी त्यांना त्यांच्या निवासस्थानी जनता दरबारा दिवशी भेटले होते मात्र, त्यांना माझ्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा होत्या, असं संबंधित महिलेनं म्हटलंय. तसंच 2017 साली माझ्या आईला आणि मला शिव्या दिल्याचा आरोपही संबंधित महिलेनं केलाय. तसंच त्यांच्याविरोधातील केस 2019 ला आम्ही संपवली होती, त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता. मात्र त्यांना कोर्टाकडून निर्दोष मुक्त केलं नाही, मी केस मागे घेतली नाही. तर पुन्हा धमकीचं पत्र मिळालंय. त्यामुळे 17 मार्चपासून मुंबईतील राजभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचं संबंधित महिलेनं केलंय.

जयकुमार गोरेंनी संजय राऊतांसह, रोहित पवार आणि एका पत्रकाराविरोधात हक्कभंग दाखल केला. माझी बदनामी करण्याचा कट आखलाय. माझं यश खटकत असल्याने बदनामीचा कट सुरू असल्याचा आरोप जयकुमार गोरेंनी केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group