समुद्र किनारा म्हणजे पर्यटकांचा आवडत पर्यटन स्थळ असत जगभरातून पर्यटक समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. अनेक समुद्र किनाऱ्यांवर तिथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी वेगवेगळे नियम आहेत. काही समुद्र किनाऱ्यांवर तिथे येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या अंगातील कपडे काढू नयेत असा नियम आहे, तर काही समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी अंगातील कपडे काढून समुद्रात अंघोळीचा अनंद घेतला तरी चालतं. परंतु एक असा समुद्र किनारा जिथे बीचवर जायचं असेल तर संपूर्ण कपडे काढावे लागतील अन्यथा एंट्री च मिळणार नाही चक्क असा नियमच आहे.

मात्र तुम्ही जर जर्मनीमधील काही खास समुद्र किनाऱ्यांना भेटी द्याल तर तुम्हाला अश्चर्याचा धक्का बसू शकतो. कारण इथे तुम्ही जर तुमच्या अंगामध्ये जास्त कपडे घातले असतील तर तुम्हाला तिथून बाहेरचा रस्ता दाखवला जातो. तुम्हाला बीचवर एन्ट्री मिळत नाही. तुम्हाला जर बीचवर जायचे असेल तर आधी अंगातील सर्व कपडे काढावे लागतात. मगच तिथे एन्ट्री मिळते. एका रिपोर्टनुसार उत्तर जर्मनीच्या काही समुद्र किनाऱ्यांसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. हे असे समुद्र किनारे जो फक्त निसर्गावर विश्वास ठेवतो आणि जे निसर्गाने आपल्याला दिलं आहे, त्याचा मनापासून स्वीकार करतो अशा लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. जर्मनीच्या बाल्टिक समुद्राचा हिस्सा असलेल्या रॉस्टॉक समुद्र किनाऱ्यावर एक विचित्र नियम बनवण्यात आला आहे. त्यासाठी रोस्टॉक टूरिझम ऑथोरेटीकडून एक 23 पानांची नियमावली तयार करण्यात आली आहे. जर तुम्ही कपडे घातलेले असतील तर तुम्हाला या समुद्र किनाऱ्यावर एन्ट्री दिली जात नाही, जर तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर एन्ट्री पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या अंगातील सर्व कपडे काढावे लागतात.
कपडे घालून समुद्रात अंघोळ करणं किंवा उन्हाचा आनंद घेणं याला या समुद्र किनाऱ्यावर मनाई आहे. हा नियम यासाठी बनवण्यात आला आहे, पूर्वी या समुद्र किनाऱ्यावर काही जण कपडे परिधान करून पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी यायचे, तर काही जण मात्र कपडे न घालताच समुद्र किनाऱ्यावर येत होते. मात्र ज्यांनी कपडे घातले आहेत, त्यांच्या ज्यांनी कोणतेही कपडे घातले नाहीत किंवा फारच तोकडे कपडे घातले आहेत त्यांच्याबाबत तक्रारी असायच्या, अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्यानं शेवटी आता इथे सर्व पर्यटकांसाठी एकच नियम लागू करण्यात आला आहे.