काल म्हणेजच 9 मार्च रोजी भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असून मोठे यश संपादन केले आहे . दरम्यान, आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी 9 मार्च रोजी न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात करत एकूण तिसऱ्यांदा आणि 2013 नंतर पहिल्यांचा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची ही आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सलग दुसरी वेळ ठरली. मात्र त्यानंतर रात्री वाजून 11 वाजून 30 मिनिटांनी एका खेळाडूने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक पोस्ट केली. बीसीसीआयचे नियम पाहता, या पोस्टमुळे खेळाडूच्या अडचणीत वाढ झालीय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या खेळाडूवर बीसीसीआय बंदीची कारवाई करण्याची शक्यता आता अधिक आहे. नक्की काय झालंय? तो खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. इंग्लंडचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये 18 व्या मोसमासाठी दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटात असलेल्या हॅरी ब्रूक याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ब्रूकने आपण या हंगामात खेळणार नसल्याचं म्हणत माघार घेत असल्याचं पोस्टद्वारे जाहीर केलं. हॅरीची माघार घेण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. त्यामुळे बीसीसीआय या खेळाडूवर बंदीची कारवाई करु शकते. बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वी आयपीएल स्पर्धेच्या अनुषगांने काही नियम जाहीर केले होते. त्यानुसार दुखापत आणि आजार या 2 कारणांचा अपवाद वगळता आयपीएलमधून माघार घेतल्यास बंदी घालणार असल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं होतं. त्यामुळे आता हॅरी ब्रूक बीसीसीआयच्या रडारवर आहे.
अनेक खेळाडू हे स्पर्धेआधी ऐन क्षणी माघार घेतात. त्यामुळे त्याचा परिणाम होतो, अशी तक्रार आयपीएल फ्रँचायजींकूडन बीसीसीायकडे करण्यात आली होती. फ्रँचायजीच्या या तक्रारीनंतर बीसीसीआयने 28 सप्टेंबर 2024 रोजी खेळाडूंसाठी नियमावली जाहीर केली होती. यानुसार आता हॅरी ब्रूकवर 2 वर्षांची बंदीची कारवाई होऊ शकते.