मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि मंत्री नारा लोकेश यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल आंध्र प्रदेश पोलिसांनी तेलुगू अभिनेता आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) नेते पोसानी कृष्णा मुरली यांना हैदराबाद येथून अटक केली. तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते पोसानी कृष्णा मुरली यांना पोलिसांनी हैदराबादमध्ये अटक केली आहे. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याविरोधात वाईट बोलल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. या बातमीने सध्या एकच खळबळ उडवली आहे.
आंध्र प्रदेश पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री हैदराबादच्या रायदुर्ग परिसरातील माय होम भुजा अपार्टमेंटमधील पोसानी कृष्णा मुरली यांना त्यांच्या घरातून अटक केली.
काय आहे प्रकरण?
पोसानी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि मंत्री नारा लोकेश यांच्याबद्दलही वादग्रस्त विधाने केली होती. बुधवारी रात्री आंध्र प्रदेश पोलिसांनी हैदराबादमध्ये पोसानी यांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली. पोसानी यांनी पोलिसांच्या या कृतीला विरोध केला पण तरीही त्यांना आंध्र प्रदेशला नेण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून पोसानी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
नोव्हेंबर 2024 मध्ये तेलुगू देसम पार्टीच्या एका नेत्याने पोसानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, सप्टेंबर 2024 मध्ये पोसानी यांनी एका पत्रकार परिषदेत चंद्रबाबू नायडू यांच्याबद्दल खोटे आणि वाईट बोलून त्यांची बदनामी केली होती.