भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- मराठी भाषेच्या विरोधात वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी भैय्याजी जोशी यांचा राज्यव्यापी निषेध म्हणून शिवसेना ठाकरे गटातर्फे शालिमार चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.

मुंबईत वास्तव्य करणाऱ्या सर्वांनाच मराठी आली पाहिजे असे काही नाही. घाटकोपरची भाषा गुजराती आहे अशी मुक्ताफळे भैय्याजी जोशी यांनी उधळल्याने महाराष्ट्रीयन जनतेत संतापाची लाट आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यास शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शालिमार चौकात जमले होते. यावेळी भैय्याजी जोशी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. हिम्मत असेल तर कर्नाटक किंवा तमिळनाडूत अशी वक्तव्ये करून दाखवा असा इशाराही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोशी यांना दिला.


यावेळी उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते,  उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे, देवानंद बिरारी, सचिन मराठे, मामा राजवाडे, गुलाब भोये, कन्नू ताजने, युवासेना जिल्हाधिकारी राहूल ताजनपूरे, भाविसे जिल्हसंघटक वैभव ठाकरे, श्रमिक सेना जिल्हा आध्यक्ष अजय बागुल, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, राहूल दराडे, शिवसेना पदाधिकारी देवा जाधव, शैलेश सूर्यवंशी, सुभाष गायधनी, ऋषी वर्मा,

तसेच , संजय चिंचोरे, नीलेश साळुंखे, विशाल कदम, मसूद जिलानी, बंडू दळवी, सुनील जाधव, प्रथमेश  गिते, ऋतुराज पांडे, प्रशात दिवे, योगेश देशमुख, वैभव खैरे, राजेंद्र सूर्यवंशी, गोरख वाघ, सुनील निरगुडे, महेंद्र आव्हाड, रवींद्र गामणे, हर्षद पटेल, दादाजी अहिरे, नाना पाटील, अजय काकडे, स्वप्निल आवटे, साहेबराव जाधव, आकाश उगले, लखन कुमावत, बबलू साबळे, मयूर जुन्नरे, भूषण भामरे, कुंदन मिश्रा, सुनील भालेकर, संदीप जाधव, राहुल मैद, संजय थोरवे, राजु राठोड, विजय काकड, नितीन जाधव, महिला आघाडी पदाधिकारी स्वाती पाटील, सीमा डावकर, शोभा दोंदे, अश्विनी पांडे, सुवर्ण काळुंगे, शोभा वाढले, योगिता गायकवाड, रंजना थोरवे, माधुरी पाटील, राणी गवळी, साक्षी विधाते आदी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group