अभिनेत्री आयशा टाकियाच्या पतीचा बेदरकारपणे गाडी चालवत गोव्यात गोंधळ?  पोलिसांकडून गुन्हा दाखल
अभिनेत्री आयशा टाकियाच्या पतीचा बेदरकारपणे गाडी चालवत गोव्यात गोंधळ? पोलिसांकडून गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर
 प्रसिद्ध अभिनेत्री आयशा टाकियाचा पती फरहान आझमीने गोंधळ घालण्याचा प्रकार घडला आहे. गोव्यातील कँडोलिम भागात बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल फरहान आझमी आणि गोव्यातील दोन रहिवाशांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी संध्याकाळी गोव्यात पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. अभिनेत्री आयशानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.


दरम्यान ,  असे सांगितले जात आहे की फरहान आणि त्याच्या मुलाला गोव्यातील काही स्थानिक लोकांकडून खूप त्रास दिला जात होता. तो म्हणाला की त्याला तासन् तास त्रास देण्यात आला आणि स्थानिक लोक त्याला ‘महाराष्ट्रातील असल्याने आणि मोठे वाहन बाळगल्याबद्दल’ वारंवार शिवीगाळ करत होते. तो पुढे म्हणाला की, फरहानने स्वतः पोलिसांना मदतीसाठी फोन केला होता, पण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

आतापर्यंतच्या समोर आलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी व्यापारी फरहान आझमी आणि गोव्यातील दोन रहिवाशांविरुद्ध गुन्हा दाखल केला. फरहान, जो लक्झरी एसयूव्ही चालवत होता, त्याला कॅन्डोलिम परिसरात काही स्थानिकांनी थांबवले आणि त्याच्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप केला. फरहानने पोलिसांना फोन केला आणि स्थानिकांना मागे हटण्यास सांगितले आणि त्यांना इशारा दिला की त्याच्याकडे संरक्षणासाठी परवानाधारक शस्त्र आहे.

काल रात्री कॅन्डोलिममध्ये सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याचा आरोप झाल्यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया यांचे पती आणि मुंबईचे राजकारणी अबू फरहान आझमी आणि 3 स्थानिक लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, त्यावेळी झालेल्या गोंधळानंतर दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने प्रकरण मिटवले. तरीही, कळंगुट पोलिसांनी राज्याच्या वतीने गुन्हा दाखल केला. अबू फरहान हा महाराष्ट्रातील सपा आमदाराचा मुलगा आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group