येवला :- काळजाचा थरकाप उडवणारी घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर या ठिकाणी घडली आहे. पाच वर्षाचा श्याम ममराज राठोड चिमूरडा शाळेतून घरी आल्यानंतर आपल्या आईच्या मागे शेतात जात असताना पाठीमागून आलेल्या पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी या चिमुरड्यावर वर हल्ला करून त्याचे लचके तोडले.
यावेळी या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हा चिमुरडा जागीच ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.