न्यूटनच्या हजारो वर्षाअगोदर गुरुत्वाकर्षणाचा नियम वेदांमध्ये,  हरिभाऊ बागडेंचा दावा
न्यूटनच्या हजारो वर्षाअगोदर गुरुत्वाकर्षणाचा नियम वेदांमध्ये, हरिभाऊ बागडेंचा दावा
img
दैनिक भ्रमर
गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हंटल तर  लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही न्यूटन या  शास्त्रज्ञाच नाव घेईल. पण आता या सिद्धांताबद्दल आता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी एक दावा केला आहे. 


न्यूटन हा शास्त्रज्ञ सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. त्याच्या डोक्यावर फळ पडलं आणि त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधला, अशी मांडणी गेल्या शे-सव्वाशे वर्षात जगाला माहिती आहे. विज्ञानाच्या पुस्तकात हा सिद्धांत आपण शिकलोय. पण न्यूटनच्या हजारो वर्षाअगोदर गुरुत्वाकर्षणाचा नियम वेदांमध्ये नमूद होता, असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या जयपूर येथील विभागीय दीक्षांत कार्यक्रमात ते बोलत होते.

“भारत हा पूर्वीपासून ज्ञान आणि विज्ञानमध्ये समृद्ध आहे. भारताने पूर्ण जगाला दशांश प्रणाली दिली. भारद्वाज ऋषींनी विमान तयार करण्यावर ग्रंथरचना केली. न्यूटनने जगाला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तर खूप उशीरा सांगितला. गुरूत्वाकर्षाचा नियमाचा उल्लेख तर फार पूर्वीपासून वैदिक ग्रंथात आढळतो.” असे बागडे नाना म्हणाले.

“अनेक शोधाची जननी भारत आहे. वीज असो वा विमान, याचा उल्लेख ऋग्वेदासहीत इतर अनेक ऐतिहासिक ग्रंथात मिळतो. भारद्वाज ऋषी यांनी विमान तयार करण्याविषयी एक पुस्तक सुद्धा लिहिली आहे. तर 50 वर्षांपूर्वी नासाने पत्र लिहून या पुस्तकाची भारताकडे मागणी केली होती.” असे बागडे म्हणाले.इंग्रजांनी भारतीय ज्ञान दाबण्याचा प्रयत्न केल्याचे राज्यपाल म्हणाले. त्यामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता वाढवणे आणि त्याला भारतीय ज्ञान आणि विज्ञानसोबत जोडणे महत्त्वपूर्ण आहे, असे बागडे म्हणाले.

नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठात जगभरातील विद्यार्थी शिकायला येत होते, असे बागडे नाना म्हणाले. तेव्हा संस्कृत ही भाषा होती. त्यावेळी इतर भाषा अध्ययनासाठी, अभ्यासासाठी नव्हत्या असे ते म्हणाले. नालंदा विद्यापीठ बख्तियार खिलजी याने जाळले होते. आता नालंदा विद्यापीठ नव्याने स्थापन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान, हरिभाऊ बागडे यांच्या विधानापूर्वी सुद्धा अनेक नेत्यांनी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील धुरंधरांनी, बाबांनी असाच दावा केलेला आहे.  राईट्स बंधुंनी विमान उडवण्यापूर्वी भारद्वाज ऋषी यांच्या विमान तयार करण्याच्या ग्रंथा आधारे शिवकर बापूजी तळपदे यांनी विमान तयार करून उडवल्याचा दावा करण्यात येतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group