उपचारासाठी डॉक्टरकडे जात असताना एक गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे दुचाकीवरून पडलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुईबावडा-उबरडे रोडवर दुचाकी घसरून हा अपघात झाला. या अपघातामध्ये सारिका आकाश देसाई या 28 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर सारिका देसाई यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. सारिका देसाई या भुदरगड तालुक्यातील भाटिवडेच्या रहिवासी होत्या.
मिळालेल्या माहिती नुसार आकाश देसाई हे पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सारिका यांना उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन जात होते, पण तेव्हाच भुईबावडा-उबरडे रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी घसरल्यामुळे सारिका रस्त्यातच जोरात पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान , सिंधुदुर्गच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होण्याआधीच सारिका यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सीपीआर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.