मागील काही दिवसांपासून राज्यात हवामानात कमालीचे बदल होताना दिसत आहेत. सुरुवातीला कडाक्याच्या थंडीने जोर धरला तर त्यांनतर काही दिवसात अवकाळी पावसाने एन्ट्री केली. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात थन्डीचा कडाका वाढला आहे. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा आणखी कडाक्याची थंडी पडणार असल्याच्या अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, राज्यात सर्वात कमी 8 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. मुंबईमध्ये 12 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील काही दिवस राज्यात थंडीचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितला आहे. पाहुयात 10 डिसेंबर रोजी राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल
मराठवाड्यातील किमान तापमानामध्ये देखील लक्षणीय घट होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे केवळ 11 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे केवळ 9 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ढगाळ आकाश राहील तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. एकंदरीत राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होत असून आता कडाक्याची थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे.