एकनाथ शिंदे यांच्या ''या''  तीन माजी  मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळात संधी नाही ?
एकनाथ शिंदे यांच्या ''या'' तीन माजी मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळात संधी नाही ?
img
दैनिक भ्रमर
उद्या राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून उद्या सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेणार आहेत.  याच हालचालीं दरम्यान नवीन माहिती समोर आली आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये वादग्रस्त वक्तव्य आणि भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळांत संधी मिळणार नसल्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या ३ मंत्र्यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून संधी मिळणार नसल्याची शक्यता आहे. 

शिवसेनेच्या ''या'' माजी मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याची शक्यता 


  • अब्दूल सत्तार - 
माजी कृषी मंत्री आणि अल्पसंख्यांक मंत्री विभागांतर्गत कारभारात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचे अनेक आरोप करण्यात आलेत. या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती ही नेमण्यात आली आहे.

  • संजय राठोड- 
माजी जलसंधारण मंत्री म्हणून सूमार कामगीरी. तसेच बंजारा समाजातील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते.

  •  तानाजी सावंत - 
माजी आरोग्य मंत्री विभागात कामकाजात आर्थिक गैरव्यव्हाराचे आरोप करण्यात आलेत. तसेच पक्ष संघटनात्नक अनेक नाराजीच्या तक्रारी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेकवेळा आल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group