डेपोमधल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ७ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उज्ज्वल रवी सिंग असे या मयत मुलाचे नाव असून तो बाजूच्या वत्सला ताई नाईक नगर या विभागात राहतो. कुर्ला येथे हि दुदैवी घटना घडली आहे. कुर्ला डेपोमध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून या चिमुकल्याचा दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी तो त्याच्या मित्रांसह कुर्ला डेपोच्या आत खुल्या जागेत खेळण्यास आला होता. यावेळी इथे इमारतीच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात तो पडला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला असता तिथे असलेल्या काही वाहन चालकांनी त्याला खड्ड्यात उतरून बाहेर काढले
दरम्यान , उपचारासाठी त्याला राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेऊन अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.