तुम्हालाही पीएफच्या पैशांवर क्लेम करायचा असेल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहें. कारण ईपीएफओकडून आता नवी गाइडलाईन्स बनविण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता काही कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट देण्यात आली आहे.
ईपीएफओच्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला जर पीएफच्या पैशांवर क्लेम करायचा असेल, त्याला जर त्याच्या पीएफ खात्यातून पैसै काढायचे असतील तर सर्वात आधी त्याचं आधार कार्ड त्याच्या यूएनआय नंबर अर्थात यूनिव्हर्सल अकाउंट नंबरला लिंक केलेलं असणं गरजेचं आहे. तरच पैसे मिळू शकतात. मात्र आता नव्या गाईडलाईन्सनुसार यामध्ये काही कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट देण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांचं जर आधार कार्ड हे यूनिव्हर्सल अकाउंट नंबरला लिंक नसेल तरी देखील त्यांना पैसे मिळणार आहेत. त्याचा पीएफ क्लेम मान्य होणार आहे. त्यामुळे त्यांना आधार कार्ड नसताना देखील पैसे काढता येणार आहेत.
यामध्ये अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ज्यांनी आपल्या पीएफ खात्याशी संबंधित सर्व असाईनमेंट पूर्ण केलेली आहे आणि ते परदेशात नोकीसाठी गेलेले आहेत किंवा स्थाईक झाले आहेत. जे भारतीय नागरिक कायमचे परदेशात स्थाईक झाले आहेत आणि त्यांनी तेथील नागरित्व घेतलं आहे. अशा लोकांना देखील यामधून सूट देण्यात आली आहे, अशा लोकांना देखील आधार कार्ड नसताना पीएफच्या पैशांवर क्लेम करता येणार आहे.