12 ऑक्टोबरला मुंबईत वांद्रे पूर्व येथील झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला. लीलावती हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, हत्या प्रकरणात पोलिसांनी 26 जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, या सार्या 26 जणांवर मोक्कालावण्यात आला आहे. क्राईम ब्रांच कडून आता या प्रकरणामध्ये कथित मुख्य शूटर शिव कुमार गौतम सह 26 जण अटकेत आहेत.
MCOCA अंतर्गत पोलिसांसमोर दिलेली कबुली न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातात. महत्त्वाची बाब म्हणजे मोक्का लागल्यानंतर आता या अंतर्गत आरोपींना जामीन मिळणेही अवघड आहे. देशभरातून वेगवेगळ्या भागातून त्यांना अटक करण्यात आली आहे.