तुम्हालाही सोने खरेदी कर्यची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण सोन्या चांदीच्या दारात मोठी घसरण झाली आहे. न्यूयॉर्कपासून ते भारताच्या बाजारपेठांपर्यंत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांतच सोन्याच्या दरात घसरण झाली, तर चांदीच्या दरातही घसरण झाली.
15 मिनिटांतच सोन्याच्या दरात 900 रुपयांची घसरण झाली, तर चांदीच्या दरात 1200 रुपयांची घसरण झाली. डॉलर निर्देशांकाच्या मजबुतीमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलरला बळ मिळत आहे. ट्रम्प यांनी काही देशांवरील शुल्क वाढवण्याची भाषा केली आहे. आकडेवारीनुसार, ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्याचा भाव 76,201 रुपये प्रति 10 ग्रॅमवर दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शुक्रवारी सोन्याचा भाव 77,128 रुपये होता.
दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण होताना दिसत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 मिनिटांत चांदीचा भाव 1175 रुपयांनी घसरून 90,034 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. आकडेवारीवर नजर टाकली तर शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा चांदीचा भाव 91,209 रुपये होता. तर आज 90,555 रुपयांवर बंद झाला. तर चांदीचा भाव 974 रुपयांनी घसरून 90,235 रुपयांवर पोहोचला आहे.