महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी आपल्या मुळगावी साताऱ्यातील दरे गावात आले आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना त्रास जाणवू लागल्यानं ते आपल्या निवासस्थानीच विश्रांती घेत आहेत. एकनाथ शिंदे यांची प्रकती बिघडल्यानं डॉक्टरांचं पथक तपासणीसाठी त्यांच्या दरे येथील निवासस्थानी दाखल झालं आहे.
राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना एकनाथ शिंदे गावी आल्याने मोठी उत्सुकता आहे. गावात आल्यानंतर दरे येथील ग्रामदैवत जननी मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी दरेतल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. पण आज दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि कणकणी जाणवत आहे. त्यामुळे ते दिवसभर घराबाहेर पडले नाहीत. 105° ताप असल्यानं उपचार सुरू केला आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे काळजी करण्याचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.