राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांच्यासाठी नागपूरच्या गोविंद टेलर म्हणजेच पिंटू मेहाडिया यांनी खास चार जॅकेट तयार केले असून ते मुंबईला रवाना झाले आहे.
येत्या ५ डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला देवेंद्र फडणवीस कुठला पोशाख परिधान करणार याकडे लक्ष लागले असताना नागपूरच्या गोविंद टेलर म्हणजेच पिंटू मेहाडिया यांनी त्यांच्यासाठी खास चार जॅकेट तयार केले आहे.
यापूर्वी मॉडेलिंग करताना देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळे पोशाख परिधान केले असताना त्याचे शहरात होर्डींग लावले असताना त्याची चांगलीच चर्चा झाली होती.
शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी चार वेगवेगळ्या रंगाचे चार जॅकेट बनविण्यात आले असून ते घेऊन गोविंद टेलर मुंबईला रवाना झाले आहे.
एका वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार , पिंटू मेहाडिया यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होत असल्यामुळे आम्हाला आनंद आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मी शिवलेले जॅकेट घालावे अशी अपेक्षा आहे. त्याबाबत त्यांच्याशी बोलणे झाल्यावर ते आता मुंबईला आणले आहे. प्रथम आमदार झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडून बंगाली कुर्ता आणि जॅकेट शिवले होते.
त्यानंतर त्यापूर्वी महापौर झाले तेव्हाही त्यांनी माझ्याकडून कपडे शिवले होते. जवळपास ३२ वर्षापासून त्यांचे कपडे शिवत आहे. ते सुरुवातीला नियमित जॅकेट घालायचे नाही, कुठला कार्यक्रम असेल तरच ते घालत होते. मात्र पण २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मी शिवलेले जॅकेट घातले होते. तेव्हापासून मी त्यांचे जॅकेट बनवीत असल्याचे त्यांनी सांगितले. आता चार जॅकेट घेऊन ते मुंबई आलो आहे. ते शपथविधी सोहळाच्यावेळी चार पैकी एक जॅकेट घालतील असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.