मोठी बातमी : एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? ;
मोठी बातमी : एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? ; "ही" महत्वाची माहिती आली समोर
img
Dipali Ghadwaje
एसटी महामंडळ मोठा  निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार असल्याची शक्यता आहे. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेऊ शकतात आहे. शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाल्यावर प्रशासन हा मोठा व महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते.

 मिळालेल्या माहितीनुसार , शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात 'लालपरी' बसमध्ये होणार असल्याची शक्यता आहे. अलीकडेच गोंदिया येथे शिवशाही बसच्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीदेखील शिवशाही बसचे अपघात झाले होते.

शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता आधापासून त्यात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला. येत्या काही महिन्यातच शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. 

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण 892 शिवशाही बस आहेत. त्यापैकी 500 बस धावत असून उर्वरित 392 बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत. शिवशाही बस या एसी बस होत्या. मात्र आता त्याचे लालपरीत रुपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असून काही आवश्यक बदल केले जाणार आहेत. शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार आहे.

शिवशाही बस सुरुवातीपासूनच वादात अडकलेल्या होत्या. नियोजनाचा अभाव, ठेकेदारांची मनमानी, तसंच, वारंवार होणारे अपघात याबरोबरच तिकिट दर जास्त असल्याने शिवशाही सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. वारंवार प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र, त्यावर एसटी प्रशासनाने आता निर्णय घेतला आहे. 

 
 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group