"...नाहीतर भाजपाचे लोक आमच्या हातातील ताट खेचायचा प्रयत्न करतील" - संजय राऊत
img
Dipali Ghadwaje
राज्यात मतदानानंंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अपक्ष आणि इतर लहान पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली असून आपल्या संभाव्य विजयी आमदारांना मुंबईत राहण्याची सोय करण्याकरता हॉटेल्सही बुक केली जात आहेत.

दरम्यान, एक्झिट पोल्सननुसार महायुतीचं सरकार येण्याची शक्यता असली तरीही हे फक्त अंदाज आहेत. त्यामुळे योग्य निकाल उद्या २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

सरकार कोणाचं स्थापन होणार, यापेक्षाही मुख्यमंत्री कोण होणार? यावरच अधिक चर्चा होत आहे. यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबईतून होणार की दिल्लीत? असा प्रश्न त्यांना आज विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीतून महाराष्ट्रात येतील. त्यांना मँडेट घेऊनच येथे यावं लागेल. शरद पवार मुंबईत असतात, उद्धव ठाकरेही मुंबईतच आहेत. आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ. नाहीतर भाजपाचे लोक आमच्या हातातील ताट खेचायचा प्रयत्न करतील, एवढे ते निर्घृण लोक आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
 
आम्ही २६ तारखेला सरकार स्थापन करतोय

संजय राऊत म्हणाले, “लोकसभेला मविआला १० जागाही मिळणार नाही, असं म्हटलं जात होतं, पण आम्हाला ३१ जागा मिळाल्या. सर्वेची ऐशी की तैशी. आम्ही काल एकत्र बसलो. महाराष्ट्रातील मतदान आणि मतदारांचा कौल यासंदर्भात जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. १६० जागा आम्ही सहज जिंकतोय. हे (एक्झिट पोल) सर्वे कोणी आणि कसे केले. कसले हे एक्झिट पोल. आम्ही २६ तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा विश्वास नाही.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group