पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळातल्या २ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. राज्य महिला आणि बाल विकास विभागाने ही कारवाई केली आहे.
पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर बाल न्याय मंडळामध्ये हजर करण्यात आले होते. त्याला निबंध लिहायला सांगून सोडण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान पदाचा गैरवापर केल्यामुळे दोघांना बडतर्फ करण्यात आलं.
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गौरवापर केला त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्या दोन अधिकाऱ्यांची पोर्श कार अपघात प्रकरणात ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यावरून आणि १७ वर्षीय मुलाला जामीन मिळण्यावरून चौकशी करण्यात आली होती.
या दोन अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी ५ अधिकाऱ्यांची समिती देखील नेमण्यात आली होती. चौकशी केल्यानंतर आणि सगळ्या पैलूंची पडताळणी केल्यानंतर जुलै मध्ये १५० पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता आणि त्यातच त्या दोन अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला होता.
यांनतर विभागाने त्यांच्याविरोधात कारवाई करत त्यांना बडतर्फ केले. कविता थोरात आणि एल एन धनावडे असं या बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत.