काँग्रेसला आणखी एक धक्का;
काँग्रेसला आणखी एक धक्का; "या" आमदाराचा शिवसेनेत प्रवेश
img
Dipali Ghadwaje
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकरणात मोठ्या घडामोडी ऐन दिवाळीच्या वातावरणात कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी गुरूवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसेच नवीन उमेदवार निवडतानाही त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असा आरोप आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. जाधव यांच्या या प्रवेशाने शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जाधव यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत जयश्री जाधव?

जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पती उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून शिवसेनचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. जाधव यांच्या निधनानंतर २०२२ मध्ये जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांनी भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभर केला आणि त्या आमदार बनल्या. परंतू २०२४ च्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती. परंतू कॉंग्रेसकडून सुरूवातीला राजेश लाटकर आणि नंतर त्यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली.

दरम्यान मुंबईत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी हा प्रवेश झाला. यावेळी क्षीरसागर यांच्यासह खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित जाधव उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group