विधानसभा निवडणुका जाहीर होताच राज ठाकरेंची मोठी घोषणा, म्हणाले…
विधानसभा निवडणुका जाहीर होताच राज ठाकरेंची मोठी घोषणा, म्हणाले…
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे.

आज राज्यात मनसेच्या बैठकांचा धडाका पाहायला मिळणार आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार आहोत, असे विधान राज ठाकरे यांनी केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुका कशा पद्धतीने लढवणार याबद्दल भाष्य केले. विधानसभा निवडणुकीनंतर मनसे नक्कीच सत्तेत असेल, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“मी माझ्या सभेत त्या दिवशी सांगितलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर मनसे नक्कीच सत्तेत असेल, हे मी फक्त कार्यकर्त्यांना उत्साह यावा यासाठी बोललो नाही. जाहीरनामा लवकरच येईल. त्यात काय असेल हे तेव्हाच समजेल”, असे राज ठाकरेंनी म्हटले.

मनसेच्या उमेदवारांची यादी

1. शिवडी, मुंबई – बाळा नांदगावकर
2. पंढरपूर – दिलीप धोत्रे
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. वणी – राजू उंबरकर

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group