"लाडक्या बहिणीच महाविकास आघाडीच्या नेत्यांना झोडपून काढणार” - चंद्रशेखर बावनकुळे
img
Dipali Ghadwaje
राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे , अनेक राजकीय घडामोडींना यामुळे वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.  यावेळी त्यांनी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

“भाजप उद्धव ठाकरेंना इतका मानसन्मान देत होती, देवेंद्र फडणवीस त्यांचे लहान भाऊ सारखे काम करत होते. आता मविआमध्ये त्यांचे काय हाल झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती केली आहे, ते उद्धव ठाकरेंना घरी बोलवतात. काँग्रेस त्यांना दिल्लीला बोलवते. 

उद्धव ठाकरे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करा. वाईट वाटते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल. आम्ही एवढा मानसन्मान त्यांना दिला. मात्र त्यांनी सर्व माती केली. महाविकास आघाडीचे नेते कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार नाहीत. 2019 मध्ये त्यांना महायुती फोडायची होती म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. आता उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीची उपयोगिता संपलेली आहे”, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

“ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सकाळी खोटारडेपणा करतात. संजय राऊत म्हणाले होते की, मध्यप्रदेशात लाडकी बहीण योजना बंद आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 1 कोटी 30 लाख महिलांना योजना सुरळीत सुरू आहे, अशी माहिती दिली.

महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि आमच्या सरकार पुढे येऊन योजना सुरूच राहणार आहे. मात्र जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आले, त्यांनी योजना बंद केली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेसशासित कर्नाटक, हिमाचल, तेलंगणा या राज्यांबद्दल बोलले पाहिजे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री स्पष्ट बोलले, संजय राऊत खोटं बोलतात. त्यांच्या विरोधात मध्य प्रदेशात गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीचा खोटारडेपणा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. जनता महाविकास आघाडीला धडा शिकवेल. लाडक्या बहिणीच महाविकास आघाडीच्या नेत्यांना झोडपून काढणार आहे”, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group