विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत पक्षाच्या 13 आणि मित्रपक्षाच्या 2 अशा एकूण 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या एकूण उमेदवारांची संख्या ही 80 इतकी झाली आहे. यामध्ये 2 मित्रपक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
नुकत्याच पक्षात आलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना कन्नडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये शिंदे गटाकडून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिरोळमधून रांजेंद्र पाटील यड्रावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नेवाशातून विठ्ठलराव लंघेंना तिकीट जाहीर झाला आहे. भांडूपमधून अशोक पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर माजी आरोग्य मंत्री तथा शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्याविरोधात घनसावंगीतून हिमकत उढाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत :