मोठी बातमी : रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती
मोठी बातमी : रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती
img
DB
आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर आता संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे गृह विभागाकडून आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
 
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. यातच आता निवडणूक संपताच रश्मी शुक्ला यांच्या सत्तेचा रजेचा कार्यकाळ संपला असून पुन्हा पदभार स्वीकारावा असा आदेश गृह विभागाने काढला असून रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आचारसंहिता संपताच पुन्हा रश्मी शुक्लांची नियुक्ती करण्यात आली असून आजच रश्मी शुक्ला पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group