मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव विधिमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे गुरुवारी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील.
दरम्यान शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहिणी देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहे. शपथविधीच्या ठिकाणी "लाडकी बहीण कक्ष" उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी दहा हजार महिलांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.