मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर महायुतीच्या गोटातून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलं आहे. या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीखही समोर आली आहे.
महायुतीचा c आहे. देवेंद्र फडणवीस ५ डिंसेबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वेगवेगळ्या मैदानाची चाचपणी महायुतीकडून सुरु होती. शिवाजी पार्कवर ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी शिवाजी पार्कवर येतात. त्यांच्यासाठी विशेष सोय शासनाकडून करण्यात आली आहे. तर आझाद मैदानावरही एका कार्यक्रमाचं आयोजन २ डिसेंबर रोजी आहे. मात्र, आझाद मैदानावरील हा कार्यक्रम ५ डिसेंबर आधी समाप्त होणार आहे. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक राज्यातील मुख्यमंत्री या शपथविधीला येण्याची शक्यता आहे. अनेक सेलिब्रिटी देखील येणार आहे. तसेच काही महंत देखील हजेरी लावणार आहे.