राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला आहे तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यांनतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले आहे. महायुतीचा विधानसभा निवडणूकांत पाशवी बहुमत मिळालेले आहे.अशा प्रकाराच्या धक्कादायक निकालांनी आता विरोधकांनी ईव्हीएमला विरोधक करीत ईव्हीएमला विरोध केला आहे. यावर यंदाचा कॉंग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झालेला आहे. त्यात सलग आठ वेळा निवडून येणाऱ्या बाळासाहेब थारोत यांचा देखील पराभव झाला आहे. यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी पुढील निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे.
तसेच , भाजपाला केवळ १५० जागांवर उमदेवार उभे करुन एवढे मोठे यश मिळत आहे, म्हणजे काही तरी गडबड असल्याचे बाळासाहेब थोरात यानी म्हटले आहे. या निकालानंतर सुजय विखे पाटील यांना अतिशय आनंद झाला आहे. याविषयी विचारता त्यांनी त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे ते आनंद करीत आहे. आम्ही आमचे काम करत राहू येणारा काळच आता याबाबत योग्य ते उत्तर देईल असेही ते म्हणाले.