अखेर ''त्या'' चर्चांवर अजित पवारांनी सोडलं मौन ! काय म्हणाले वाचा सविस्तर
अखेर ''त्या'' चर्चांवर अजित पवारांनी सोडलं मौन ! काय म्हणाले वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळविला भाजपसह घटक पक्षांनाही चांगलीच बाजी मारली. मात्र महाविकास आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला आहे. दरम्यान आत राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले असून  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा सुरु होती. तसेच , अजित पवार यांची शरद पवार गटाच्या आमदारांसोबत गुप्त बैठक झाल्याचीदेखील चर्चा आहे. मात्र आता यावर अजित पवार यांनी मौन सोडलं आहे.

दरम्यान , शरद पवार गटाचे आमदार तुमच्या पक्षात येणार असल्याची चर्चा आहे, याबाबत काय सांगाल? असा प्रश्न अजित पवारांना आज पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “निकाल लागून अजून तीन दिवस झाले. अजून कशातच काही नाही. मात्र काहीपण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या संपर्कात कोणीही नाही. मी निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतली. त्यात आमच्या पराभूत आमदारांचा देखील समावेश होता. त्यांचे मन जाणून घेतलं. निवडून आलेल्या आमदारांना सूचना केल्या. त्यांना मतदारसंघात जाऊन जनतेच्या आभार मानायचं सांगितलं”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group