आज सायंकाळी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असून भाजप नेते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसयांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भावना व्यक्त करताना त्यांनी एक शायरी शेअर केली आहे. तसेच तुमच्या देवाभाऊवर आणि वहिनींवर केलेल्या प्रेमाबद्दल मी तुमची आभारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे काही क्षण अमृता फडणवीसांनी शेअर केले आहे. तसेच एक शायरी शेअर केली आहे. त्या म्हणाल्या, पलट के आई हूँ शाखों पे खुशबुएँ लेकर, ख़िज़ाँ की ज़द का अब ग़म नहीं , मौसमे-बहार मरहमे ख़ुशी लाई है !
तसेच धन्यवाद महाराष्ट्र तुमच्या भाऊ आणि वहिनीवर मनापासून प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल आम्ही महाराष्ट्राचे आभारी आहोत. मी सदैव महाराष्ट्राच्या सेवेसाठी आणि सकारात्मक बदलांसाठी माझे योगदान असेल…