नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : गेल्या दोन तासांपासून नाशिक रोड जेलरोड आणि परिसरात ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना चांगलेच हाल झाले आहेत.
चार पाच दिवसापूर्वी थंडीचे आगमन झाल्यानंतर अनेक ठिकाणी शेकोट्या पाहायला मिळत होत्या. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आणि दिवसभर अभुटाचे वातावरण होते. बुधवारी रात्री दहा ते अकरा वाजता जोरदार पाऊस सुरू झाला, त्यानंतर मध्यरात्री दोन नंतर पाऊस अधिकच तीव्र झाला. गुरुवारी सकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला, तर दुपारी उन्हाच्या चटक्यांनी अंगाला त्रास दिला.
संध्याकाळी सुमारे सात वाजता ढगफुटी सदृश पाऊस सुरू झाला आणि पावसासोबत वीज गायब झाली, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत संपूर्ण परिसर अंधाराने व्यापला होता.