परभणीत काही समाजकंटकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. या घटनेसंबंधी आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी हल्लेखोरांना अटक करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशाराच दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. या घटनेसंबंधी आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येत्या चोवीस तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे.
तसेच , प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले.