शत्रक्रियेनंतर 43 महिलांना चक्क 43 महिलांना कडाक्याचा थंडीत झोपवले जमिनीवर झोपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोलीतील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलं आहे. काल शुक्रवारी ग्रामीण भागातील महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. पण बेड नसल्याने यातील 43 महिलांना थेट फरशीवर झोपवण्यात आले. ऐन थंडीच्या कडाक्यात महिलांना फरशीवर झोपावे लागले. आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार समोर आला. या सर्व घटनेनंतर नागरिकांनी आरोग्य खात्यावर रोष व्यक्त केला.
काल 13 डिसेंबर रोजी कुटुंब कल्याण योजना शिबिरात महिलांना थंडीच्या काळात थेट जमिनीवर झोपावे लागले. शस्त्रक्रियेनंतर झोपण्यासाठी रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली. कळमनुरी तालुक्यातील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडला. याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या घटनेवर आमदार संतोष बांगर यांच्या भूमिकेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
बाळापुर घटनेनंतर आरोग्य विभाग खड़बडून जागा झाला. जिल्हा शल्यचिकित्सकांसह जिल्ह्याच पथक बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल घडलेल्या घटनेनंतर अधिकचे 20 बेड वाढवणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक नितिन तडस यांनी दिली आहे.