राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून आज रवीवरी सायंकाळी महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळात ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजप पक्षाचे १९, शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात ३३ कॅबिनेट सहा राज्यमंत्री झाले.
राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये मंत्रीपदे आहे. परंतु १६ जिल्ह्यांमधी मंत्री म्हणून कोणालाच संधी नाही. पुणे, जळगाव-नाशिकमधून तीन-तीन मंत्री झाले आहेत. तसेच साताऱ्यास सर्वाधिक चार मंत्रीपदे दिली.
दरम्यान, भाजपने काही जुना चेहऱ्यांना वगळून नऊ नवीन चेहऱ्यांना संधी दिली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सहा नवीन चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात स्थान दिले. तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये पाच नवीन चेहऱ्यांना संधी दिली