गंगापूर रोडला घरफोडीत २८ तोळे सोन्याचे व एक किलो चांदीचे दागिने लंपास
गंगापूर रोडला घरफोडीत २८ तोळे सोन्याचे व एक किलो चांदीचे दागिने लंपास
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- राहत्या घराच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरातील २८ तोळे सोन्याचे व एक किलो चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कीर्ती त्र्यंबक कदम (रा. शंकरनगर, गंगापूर रोड, नाशिक) हे व त्यांचे पती नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने दि. ९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घराच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.

यावेळी घरातील बेडरूममध्ये असलेले कपाट उघडून त्यातील १ लाख ८ हजार रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, १ लाख २० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे तीन कडे, ८० हजार रुपये किमतीचा दोन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीची तीन तोळे वजनाची तीन मंगळसूत्रे, ६० हजार रुपये किमतीची दीड तोळा वजनाची कानातील रिंग, ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा दोन तोळे वजनाचा नेकलेस, ४० हजार रुपये किमतीचा दोन तोळे वजनाचा नेकलेस, ८४ हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन, ६० हजार रुपये किमतीचे एक किलो चांदीचे दागिने व ३५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९ लाख ७ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group