राज्यात महिला सुरक्षेचा प्रश ऐरणीवर असून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एका पाठोपाठ एक घटना उघडकीस येत आहेत. विशेतः सध्या अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार आणि हत्या या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे.
कल्याणमध्ये आईकडून पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला, बलात्कारानंतर तीची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. 23 डिसेंबर रोजी या अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आता हा खटला ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.
या प्रकरणात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लक्ष घातलं आहे.या प्रकरणात तातडीनं कारवाई केली जाईल. ज्येष्ठ वकील उज्वल निकम हे हा खटला लढवतील. ठाणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात 30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. पीडित मुलगी ही मला माझ्या मुलीसारखी आहे. तिला न्याय मिळून देणं माझी जबाबदारी आहे. चार महिन्यांच्या आत आरोपीला कठोर शिक्षा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिलं आहे.
तसेच, आता या खटल्याचं काम ज्येष्ठ वकील उज्वल निकम हे पाहाणार आहेत. तसेच या प्रकरणात 30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. आरोपीला चार महिन्यांच्या आत शिक्षा होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.