नवी दिल्ली : दिल्लीतील मॉडेल टाउन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुनीत खुराना नावाच्या एका व्यक्तीने ५४ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे .
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की पुनीत त्याची पत्नी मनिका पाहवा हिच्या त्रासाला कंटाळला होता. दोघांमध्ये घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांनी घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी पुनीत खुराना प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, पुनीत कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणावातून जात होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे .