आधी नव्या वर्षाचं सेलिब्रेशन केलं अन् मग....; तरुणाने आपल्याच कुटुंबातील पाच जणांना संपवलं
आधी नव्या वर्षाचं सेलिब्रेशन केलं अन् मग....; तरुणाने आपल्याच कुटुंबातील पाच जणांना संपवलं
img
Dipali Ghadwaje
सरत्या वर्षाला निरोप दिला अन् नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केले. पण त्यानंतर एक तरूण हैवान झाला, त्याने आपल्याच कुटुंबातील पाच जणांना संपवले. आरोपी तरूणाने आई आणि चार बहि‍णींना एका क्षणात संपवले. धक्कादायक म्हणजे, कुटुंबाला संपवण्यासाठी वडिलांनीही त्याला मदत केली. त्यानंतर आरोपी रक्ताने माखलेल्या कपड्यासह पोलिसात पोहचला अन् हत्येची माहिती दिली. लखनौमधील या थरारक घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसलाय. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब आग्रा येथील आहे. नव्या वर्षाच्या निमित्ताने फिरण्यासाठी लखनौला आले होते. लखनौच्या हॉटेलमधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कौटुंबिक वादामधून त्या तरूणाने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासातून समोर आले. आरोपीचे नाव अरशद असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलेय.

नेमकं काय घडलं ? 

३० डिसेंबर रोजी आग्रा येथून हे कुटुंब फिरण्यासाठी लखनौला आले होते.  लखनौच्या हॉटेलमध्ये अरशदने आपल्या अख्ख्या कुटुंबालाच संपवले. नव्या वर्षाचे स्वागत केल्यानंतर आनंदात असणारा अरशद इतका क्रूर कसा झाला? हे अनाकलनीय आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलेय.

अर्शदने पोलिसांच्या चौकशीत हत्येची कबुली दिली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी अर्शदने आपल्या चार बहिणी आणि आईची हत्या केल्याचं सांगितले. अर्शद दररोज आपल्या कुटुंबाला त्रास देत असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. अर्शद हा फेरीवाल्याचं काम करायचा. तो रागीट आहे, तो आपल्या  कुटुंबाला खूप त्रास द्यायचा. त्यामुळे कुटुंबात अनेकदा काही ना काही कारणामुळे भांडणं व्हायचीच. माझं काय बरं वाईट झालं तर कुटुंबाचं काय होणार? याची भीती अर्शदला नेहमीच असायची. त्यामुळेच त्याने आपल्या कुटुंबाला मारले असेल. 

अर्शदने आधी कुटुंबीयांना घेऊन अजमेर येथे घेऊन गेला, त्यानंतर लखनौला आला. त्यानंतर सर्वांना हॉटेलमध्ये राहायला लावले. रात्री जेवण झाल्यानंतर तोंडात कापडा कोंबला अन् गळा दाबून संपवले. काहींची त्याने मनगटे कापली. अर्शदला या कामात त्याच्या वडिलांनी मदत केली. पाच जणांचा जीव घेतल्यानंतर त्याने वडिलांना रेल्वे स्टेशनवर सोडले अन् पोलीस स्टेशन गाठून हत्येबाबत माहिती दिली. आरोपीने सांगितल्यानंतर पोलिसांनी ब्लेड अन् स्कार्फ जप्त केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group