कल्याण पूर्वमध्ये एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीला अटक करण्यात आली. आता पोलिसांनी आरोपी विशाल गवळी याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी आज कल्याण येथील न्यायालयात हजर केलं. तेव्हा सुनावणीवेळी न्यायालयाने विशाल गवळी आणि त्याची पत्नी दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी विशाल गवळी याला न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. तेव्हा न्यायालयाने या जोडप्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपीला सोबत घेवून पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्याचं समोर आलं होतं.
काय आहे प्रकरण?
कल्याण पूर्वमधून 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं होतं. ही मुलगी आईकडून 20 रूपये घेवून खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. बाहेर गेल्यानंतर बरेच तास उलटले, पण ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी कोशळेवाडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु या मुलीचा मृतदेह 24 डिसेंबर रोजी कल्याण जवळ असलेल्या बापगाव परिसरात सापडला.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना विशाल गवळी नावाच्याच व्यक्तीने या मुलीचं अपहरण केलं असून तिच्यावर अत्याचार करून हत्या केलं असल्याचं समोर आलं.
विशाल गवळीच्या बायकोने घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या उकलमुळे देखील या प्रकरणाची उकल सहजरित्या झाली आहे. विशाल गवळीचा स्वभाव विकृत स्वभावात असल्याचं समोर आलंय. त्यानेच या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याचं समोर आले आहे .