रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंजीनियरिंग विद्यार्थ्याला अटक
रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंजीनियरिंग विद्यार्थ्याला अटक
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):  इंजीनियरिंग विद्यार्थ्याने रेल्वे पटरीवर लोखंडी अँगल व मोठे दगड ठेऊन अपघात घडवण्याचा धाडसी प्रयत्न केला. या प्रकारामुळे मोठा अनर्थ टळला, कारण रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे गाडी थांबवली आणि हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.

घटनेची माहिती अशी की, नाशिकरोडकडून हरिद्वार कडे जाणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे चालक 191/9-11 किलोमीटर मार्गावरून जात असताना, त्यांनी रेल्वे पटरीवर अडथळा आढळला. एक लोखंडी फलक तुटलेला होता आणि त्याबरोबर मोठे दगड ठेवले होते. चालकाने गाडी तात्काळ थांबवली, तरी काही भागाला इजा झाली.

रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरफुल सिंग यादव,आर एन सिंग, किशोर चौधरी, पोलीस अमलदार विशाल पाटील जाऊन तपास केला. यावेळी अभिनव नरेश बावणे (वय १९), जो नाशिकरोड येथील एकलहरा कॉलनीचा रहिवासी आहे तो आढळून आला व त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, अभिनव याने इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असल्याचे सांगितले. त्याचे मानसिक स्थितीवर आधारित चौकशी केली असता त्याची मानसिक समस्या समोर आली.

या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group