आजकल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून कायद्याचाही धाक न जुमानता काही क्रूर वृत्तीचे लोक अनेक भयंकर गुन्हे सर्रास पाने करतात. तसेच सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना बलात्कार आणि हत्ये सारखे गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील चिंताजनक वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे.
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपी विशाल गवळी याला त्याच्या पत्नीच्या गावातून अटक केली आहे. या अटकेनंतर पोलिसांनी या बलात्कार हत्याप्रकरणात नराधमाची पत्नी साक्षी गवळी हिला देखील अटक केली होती. या अटकेनंतर दोघांना कोळशेवाडी पोलिसांनी आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत नराधम विशाल गवळीने सुरूवातीला मुलीवर अत्याचार केला, त्यानंतर तिची हत्या केली होती.या हत्येनंतर बायकोला हा संपूर्ण घटनाक्रम सांगून तो तिच्याच गावी पळून गेला होता. या दरम्यान पोलीस ज्यावेळी या घटनेचा तपास करत होते, त्यावेळेस पोलिसांना गवळीच्या घराबाहेर रक्ताचे डाग दिसले होते. हे डाग पाहून पोलिसांना संशय बळावला आणि त्यांनी घरातून साक्षी गवळी यांना ताब्यात घेतलं होतं.
पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी करायला सूरूवात केली.या चौकशीत तिचे संपूर्ण घटनेचा उलगडा केला.यावेळी चौकशीन साक्षी पोलिसांना म्हणाली की, विशालने मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले. त्यावेळी विशाल गवळीने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी 7 वाजता घरी आली. त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून तिला धक्काच बसला. मात्र नंतर 7 वाजता दोघे पती-पत्नी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याबद्दल योजना आखली. त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री 8.30 वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. 9 वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले होते.
घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी येथे निघून गेला आणि पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली. मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल याने हे कृत्य केल्याचा संशय आला. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.