नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): नाशिकरोडवरील बिटको रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्थित फुटपाथवर एका युवकाचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहास काठीने मारलेले अनेक ठसे दिसून आले असून, पोलिसांनी प्रारंभिक तपासानुसार अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मृत युवकाची ओळख खर्जुल मळा येथील 35 वर्षीय सुनील सूर्यवंशी म्हणून करण्यात आली आहे.
मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, डॉक्टरांचा अहवाल मिळाल्यानंतर खूनाची तक्रार दाखल केली जाईल. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी पोहोचले आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.