सतिश वाघ हत्याप्रकरणी सर्वात मोठा खुलासा !  पत्नीनेच दिली सुपारी
सतिश वाघ हत्याप्रकरणी सर्वात मोठा खुलासा ! पत्नीनेच दिली सुपारी
img
दैनिक भ्रमर
भाजप  आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आलीय. या हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात आता सर्वांत मोठा खुलासा झाला आहे. सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिकरणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी दिली असल्याचं तपासातून निष्पन्न झालं असल्याची माहिती आहे. दरम्यान,  सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याच उघड झाले. सतिश वाघ यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली होती. वाघ  यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं होते. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group