जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करत असतात. त्यात थर्टी फर्स्ट म्हंटल की तळीरामांचा जल्लोषच वेगळा असतो. दरम्यान 2024 वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. सहा ते सात दिवसांवर थर्टी फर्स्ट आह. याच पार्शवभूमीवर तळीरामांच्या आनंदात भर पाडणारी बातमी समोर आली आहे. तसा आदेशच सरकारने काढला आहे.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राज्यातील दारुची दुकाने, पब, बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. परंतु, कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांततेचा विचार करून परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान , थर्टी फर्स्टला रात्रभर होणारा जल्लोष विचारात घेऊन सरकारी पातळीवरही नियोजन केलं जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. या काळात मद्य आणि बिअरला मागणी वाढलेली असते. हॉटेल्स, पबमधील पार्ट्याही असतात. याद्वारे मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो.
या गोष्टींचा विचार करून आता सरकारनेही वेळेत बदल केला आहे. 24,25 आणि 31 डिसेंबर या दिवशी पहाटेपर्यंत दारू मिळणार आहे. बिअर/वाइन विकणाऱ्या दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. FLBR-II परवानाधारकांसाठी याच पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली आहे. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने राज्यातील दारू दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागानेच याबाबत आदेश जारी केले आहेत.