आजकाल अपघाताच्या घटनांनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही अपघात इतके भीषण असतात की त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागतात अशीच एक घटना बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे
या घटनेत एक भरधाव ट्रक पलटी झाला आहे. हा ट्रक पलटी होऊन एका कारवर आदळला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात सांगलीच्या जत गावातील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन अल्पवयीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनेने जत गावात शोककळा पसरली आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे रहिवासी असलेले चंद्रम इगाप्पागोळ हे ख्रिसमसची सुट्टी पडल्याने आपल्या कुटुंबियाना घेऊन चारचाकीने गावी निघाले होते. यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. हा ट्रक थेट इगाप्पागोळ यांच्या कारवर पलटी झाला होता.त्यामुळे मोठा अपघात घडला आणि कारचा अक्षरश चेंदामेंदा झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार , या घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पती चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (16), मुलगी दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.या प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सूरू आहे.