विराट कोहलीच्या ‘वन 8 कम्यून’ पबला बंगळुरू महानगरपालिकेची नोटीस, काय आहे  कारण ?
विराट कोहलीच्या ‘वन 8 कम्यून’ पबला बंगळुरू महानगरपालिकेची नोटीस, काय आहे कारण ?
img
दैनिक भ्रमर
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या पबला नोटीस बजावण्यात आली आहे. अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल  बंगळुरू महानगर पालिकाने (BBMP) क्रिकेटपटू विराट कोहलीच्या ‘वन 8 कम्यून’ पबला नोटीस बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते एच. एम. वेंकटेश आणि कुनीगल नरसिंहमूर्ती यांच्या तक्रारीनंतर, 29 नोव्हेंबरला BBMP कडून नोटीस देण्यात आली होती. मात्र, अद्याप या नोटीसला उत्तर मिळालेले नाही. आता BBMP ने सात दिवसांची अंतिम मुदत दिली असून, या वेळेत उत्तर न मिळाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शांतीनगर विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

हे रेस्टॉरंट एम. जी. रोडवरील रत्नम कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावर स्थित आहे, जे चिन्नास्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या जवळ आहे. अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) नसतानाही हे पब चालवले जात असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार वेंकटेश यांनी सांगितले, “बंगळुरूमधील अनेक रेस्टॉरंट, बार आणि पब उंच इमारतींमध्ये अग्निसुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजनांशिवाय सुरू आहेत. याआधी घडलेल्या आगीच्या घटनांमध्ये मोठा जीवितहानी आणि जखमींचा फटका बसला आहे. उदाहरणार्थ, कार्लटन टॉवर्समधील शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लोकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या होत्या.” असे यावेळी त्यानोई सांगितले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group