मुंबई, ठाण्यात बांगलादेशींवर पोलिसांची धडक कारवाई
मुंबई, ठाण्यात बांगलादेशींवर पोलिसांची धडक कारवाई
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्र पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये आले असून कोणतीही कागदपत्रे नसताना महाराष्ट्रात राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. खारघर येथील कोपरा येथून चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक पुरुष व तीन महिला आहेत. खारघर पोलीस ठाण्यात बांगलादेशी नागरिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाशीच्या एपीएमसी परिसरात पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी एक पुरुष व पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठाणे जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मानपाडा आणि भिवंडी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे २५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळलेली नाहीत. मानपाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. 

तसेच, डोंबिवलीतील एका ठिकाणी सात बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी सापळा रचून या सात नागरिकांना ताब्यात घेतले. तसेच भिवंडी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांवर विदेशी नागरिक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group